अज्या-शीतली लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

नितीश आणि शिवानी यांचे 'चाहूल' हे नवीन गाणे लवकरच....

मुंबई :

“लागीरं  झालं जी”,या लोकप्रिय मालिकेची प्रिय जोडी म्हणजे, “अज्या आणि शितली”, अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता नितीश चव्हाण पुन्हा एकदा वेगळ्या ढंगात  दिसणार आहेत. नितीश आणि शिवानी यांचे ‘चाहूल’ हे नवीन गाणे लवकरच रिलीज होणार आहे . पुन्हा एकदा ही जोडी पडद्यावर एकत्र दिसणार आहे, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

सजलं रूप तुझं, रुजलं बीज नवं, उधाण वारं हसतंय, धजलं तुझ्या म्होर, फसलं आता खरं, पाखरागत उडतंय….. असे गाण्याचे बोल आहेत. सध्या रसिक प्रेक्षकांमध्ये या रोमँटिक गाण्यांचा क्रेझ दिसतोय. म्हणूनच  हे प्रेमगीत संगीत व्हिडिओसह प्रेक्षकांसमोर आले आहे.

या गाण्याचे आकर्षण म्हणजे  “लागीरं  झालं जी” फेम शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण म्हणजेच शितली आणि अज्या ही जोडी या गाण्यात रोमँटिक अंदाजात  दिसणार आहेत. हे गाणं मंगल पी, अभिजित आणि विश्वजित , ‘एव्ही प्रॉडक्शन’ आणि ‘मराठी म्युझिक टाऊन’ प्रस्तुत आणि ओंकार माने दिग्दर्शित आहे .  ‘एव्ही प्रॉडक्शन’प्रस्तुत  ‘मन उनाड’ या यशस्वी गाण्यानंतर त्यांचे हे नवेकोरे ‘चाहूल’ गाणं नक्कीच प्रेमाची चाहूल लावणारे आहे. ‘

एव्ही प्रॉडक्शन’सह ‘मराठी म्युझिक टाऊन’ या म्युझिक लेबलने या गाण्याला प्रस्तुत केले असून, या म्युझिक लेबल अंतर्गत असलेलं हे पहिले वहिलं गाणं आहे. ओंकारने यापूर्वी ‘बेखबर कशी तू’ या म्युझिक व्हिडिओद्वारे प्रेक्षकांना भेट दिली होती. या व्यतिरिक्त ओंकार यांनी ‘चंद्र झूल्यावार’ आणि ‘तू ये साथीला’ ही गाणीही दिग्दर्शित केली. विश्वजितने निर्मित केलेले हे दुसरे मराठी गाणे आहे.

गायक विजय भाटे यांनी आपल्या दमदार आणि मधुर आवाजात हे गाणे गायले आहे. राहुल थोरात यांची गीते असून संगीत आशिष आणि  विजय यांनी दिले आहे. शिवानी आणि नितीशची सुप्रसिद्ध जोडी पुन्हा ‘चाहूल’ या गाण्याने सर्व रसिकांसाठी मेजवानी देईल.