मुंबई:
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नेहमीच त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. कधीही याअगोदर दोघेही त्यांच्या नात्याबद्दल बोलले नव्हते. आलिया नेहमीच रणबीर चांगला मित्र असल्याचे सांगते. मात्र, आता रणबीरने या नात्याबद्दल दुजोरा दिला आहे. रणबीरने नुकतीच राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत आपली गर्लफ्रेंड आलियाबद्दल सांगितले. आणि ऐवढेच नाहीतर लग्न कधी करणार आहे याबद्दल देखील रणबीरने सांगितले आहे. रणबीरने मुलाखतीत सांगितले की, दोघांनी लॉकडाऊनमध्ये एकत्र वेळ घालवला. दिवसभर रणबीर चित्रपट आणि मालिका बघायचा, तर आलिया काहीतरी नवीन शिकत होती.
रणबीरने लॉकडाऊनमध्ये आपला वेळ कसा घालवला हे सांगितले. तो म्हणाला की, सुरुवातीला आम्ही कौटुंबिक त्रासातून जात होतो. त्यानंतर, मी पुस्तकं वाचन आणि कुटुंबासोबत वेळ घालवू लागलो आणि दिवसातून 2-3 चित्रपट बघायचो. आलियासोबतच्या लग्नाबाबत रणबीर म्हणतो की, हा कोरोना व्हायरस आला नसता तर कदाचित आम्ही आतापर्यंत लग्न देखील केले असते.रणबीर आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले होते.
नुकत्याच एका मुलाखतीत ‘स्टार’ आणि ‘डिज्नी इंडिया’ चे अध्यक्ष उदय शंकर यांनी ‘ब्रह्मास्त्र’ हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट असण्याची शक्यता वर्तविली आहे. ‘एचटी लीडरशिप समिट 2020’मध्ये बोलताना शंकर म्हणाले की, “ब्रह्मास्त्र” हा आतापर्यंत बनलेला भारतातील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. पण याबद्दल बोलताना उदय यांनी चित्रपटाचे बजेट जाहीर केले नाही. जेव्हा उदय शंकर यांना, ‘ब्रह्मास्त्र चित्रपटाची एकूण किंमत 300 कोटी आहे का? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, त्यापेक्षाही जास्त आहे. असा कोणताही चित्रपट करण्यास वेळ लागतो. आणि अशा चित्रपटाला चित्रपटगृहात चांगला प्रेक्षक वर्ग मिळू शकतो. या चित्रपटामध्ये खूप ग्राफिक्स चा वापर केला आहे. करण जोहर हा चित्रपट ओटीटी रिलीजवर करण्याबाबत उत्सुक नसल्याचे म्हटले जात होते.