भीमा कोरेगांव प्रकरणात संशयित म्हणून आनंद तेलतुंबडे आणि इतर १४ विचारवंतांची निर्दोष मुक्तता करावी.

दि. १७ ऑगस्ट रोजी मानवी हक्क क्रांतीच्या वतीने काढणार मोर्चा

अहमदनगर (वैष्णवी घोडके)
                              भिमा कोरेगांव च्या दंगलीमध्ये सामील असलेल्या खऱ्या आरोपींना वाचविण्यासाठी आनंद तेलतुंबडे व इतर १४ देशभक्त व विचारवंत लोकांना अटक करण्यात आली. त्यांची त्वरीत निर्दोष मुक्तता करावी. या मागणीसाठी राहुरी येथील सर्व संघटनांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा.

 

 

                                      राहुरी येथील नायब तहसीलदार डमाळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, भीमा कोरेगाव दंगल प्रकरणामध्ये त्यावेळी असलेल्या फडणवीस सरकारने देशद्रोहाच्या खोट्या आरोपाखाली आनंद तेलतुंबडे व इतर १४ विचारवंतांना संशयित म्हणून अटक करण्यात आलेली आहे. यातील अनेक विचारवंत हे उच्चशिक्षित व प्रतिष्ठित आहे. यातील अनेक जण वयोवृद्ध आहेत. आणि या सर्व विचारवंतांना केवळ संशयाच्या कारणावरून गेल्या दोन वर्षापासून जास्त काळ कारागृहामध्ये ठेवण्यात आलेले आहे. महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा पसरवण्याचे काम तसेच दलित – आदिवासी, शोषित पीडित, वंचित घटकांसाठी आयुष्य पणाला लावणारे हे विचारवंत केवळ संशयाच्या कारणास्तव कारागृहामध्ये खितपत आहेत. त्यांना जामीन करून निर्दोष मुक्त करावे आणि त्यांना न्याय मिळावा.

 

 

 

                                     याकरिता राहुरी येथील सर्व पुरोगामी संघटना एकत्र येऊन मंगळवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी १२.३० वा. राहुरी बस स्थानकापासून राहुरी तहसील कार्यालयावर मानवी हक्क क्रांती यांच्या वतीने मोर्चा काढणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीच्या अनुषंगाने वेळोवेळी लागू केलेल्या सीआरपीसी कलम १४४ चे पालन करून तसेच कोरोनाच्या बाबतीत शासनाने निर्गमित केलेल्या नियमांचे व अटींचे पालन करून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन सादर केले जाणार आहे. असे निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर प्रविण लोखंडे, कांतिलाल जगधने, तानसेन बिवाल, अशोक तुपे, पिंटूनाना साळवे, मनोज हासे, संजय संसारे, निलेश जगधने, शरद संसारे, चंद्रकांत जाधव, गणेश पवार, रोहित तेलतुंबडे, ज्ञानेश्वर जगधने, कैलास पवार, अप्पासाहेब मकासरे, नामदेव पवार, गुलाब बर्डे, जावेद काकर, संदिप कोकाटे, मदिना शेख, अंकुश भवारी आदिंच्या सह्या आहेत