मंदार मुळे यांना मातृ शोक

नगरच्या अमरधाम स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार

अहमदनगर :  

अहमदनगर मधील  सीसीटीव्ही व्यवसायातील प्रसिद्ध व शिवसैनिक मंदार मुळे यांना मातृ शोक झाला आहे.  त्यांच्या मातोश्री श्रीमती रजनी मुरलीधर मुळे यांचे अल्प आजाराने निधन झाले आहे.   त्या 70वर्षांच्या होत्या  होते.   त्यांच्या मागे 3 मुळे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  त्यांच्यावर राहत्या घरी उपचार सुरू असताना काल रात्री 11 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यांच्या पार्थिवावर नगरच्या अमरधाम स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.  यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.  शांत व मनमिळाऊ स्वभावाच्या रजनी ताई धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या अशा जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे.