भावेश भिंडेला उदयपूर मधून अटक

घाटकोपर येथे जो जाहिरात फलक कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला, तो फलक उभारणार्‍या कंपनीचा मालक भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांनी राजस्थान मधील उदयपूर येथून अटक केली. जोरदार वाऱ्यांमुळे जाहिरात फलक एका पेट्रोल पंपावर कोसळला होता. या घटनेनंतर इगो मीडिया प्रायव्हेट लि. या कंपनीचा प्रमुख भावेश भिंडे वेपत्ता झाला होता. तो राजस्थानात असल्याचे समजतात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने तेथे जाऊन त्याला अटक केली. दरम्यान या दुर्घटनेतील मृतांची संख्या 16 वर गेलेली आहे. घटनास्थळावर मलबा उपसण्याचे काम आज सलग चौथ्या दिवशीही सुरू होते. बुधवारी रात्री दोन मृतदेह सापडले मुंबई विमानतळाचे माजी एअर ट्रॅफिक कंट्रोल जनरल मॅनेजर मनोज चानसोरीया आणि त्यांची पत्नी अनिता यांचे ते मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे चानसोरीया आहे. अभिनेता कार्तिक आर्यन याचे जवळचे नातेवाईक आहेत. मनोज चानसोरीया आहे. आपल्या पत्नी सोबत मध्य प्रदेशातील जबलपूरला जाण्यासाठी निघाले होते. पेट्रोल पंपावर ते पेट्रोल भरण्यासाठी आले असता, त्यांच्या गाडीवर होर्डिंग कोसळले.