कर्जत-जामखेडच्या सरकारी कार्यालयांमध्ये मिळणार स्वच्छ पाणी

आ. रोही पवारांच्या स्थानिक विकास निधितून वॉटर कूलर कम फिल्टर

कर्जत-जामखेड मधील प्रशासकीय कार्यालयांसाठी आमदार रोहित पवार यांच्या स्थानिक विकास निधितून वॉटर कूलर कम फिल्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त येणारे नागरिक यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर होणार असून त्यांना स्वच्छ आणि थंड व गरम पाणी उपलब्ध होणार आहे.कर्जत-जामखेडमधील प्रशासकीय कार्यालयांमध्ये यापूर्वी पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला कायमच घरून अथवा विकत पिण्याचे पाणी आणावे लागत होते.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

 

तालुक्याच्या विविध भागातून कामासाठी आलेल्या नागरिकांची सरकारी कार्यालयात कायमच वर्दळ असते. या लोकांचीही पिण्याच्या पाण्याबाबत मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात आल्याने आमदार रोहित पवार यांनी आमदार निधीतून कर्जत-जामखेडमधील प्रशासकीय कार्यालयांसाठी वॉटर कूलर कम फिल्टर उपलब्ध करून दिले आहेत. मतदारसंघातील प्रशासकीय यंत्रणांचे सक्षमीकरण करण्याचा आमदार रोहित पवार यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. त्यांच्या या कामाचे जनतेसोबच प्रशासकीय वर्गातूनही विशेष कौतुक होत आहे.