अमृत पाणी योजनेच्या कामात ठेकेदार टाकतायेत पाट्या

शिव राष्ट्र सेनेचे आयुक्तांना निवेदन , कारवाई न झाल्यास आत्मक्लेश उपोषण

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

नगर जिल्हयात काही दिवसापासून अमृत पाणी योजना आणि भुयारी गटाराचे काम जोरदार सुरु आहे. हे काम करणारा ठेकेदाराच्या अपूर्ण ज्ञानामुळे रस्त्यांमध्ये खड्डे खोदून फक्त पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. कामात कोणत्याही प्रकारची नियोजनबद्धता दिसत नाहीय. थोडक्यात ठेकेदार खऱ्या अर्थाने पाट्या टाकण्याचे काम करत आहेत.

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राइब करा.

 

 

या कामामुळे रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये साठलेले मैलामिश्रित पाणी नागरिकांच्या घराघरांत पोहोचलंय.  त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. सामान्य नागरिक रोगराई आणि अपघात या दोन्ही ही कारणांमुळे आपला जीव गमवावा लागतोय.  या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत शिव राष्ट्रसेना पक्षाच्या वतीने  मनपा आयुक्तना अनेकवेळा निवेदने  आणि पत्रव्यवहार झालाय. परंतु या बाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाहीय.

 

 

 

येत्या काही दिवसात या वर योग्य तो विचार करून कार्यवाही झाली नाही, तर  १५ ऑगस्ट ला मनपा आयुक्तांच्या कार्यालयाच्या आवारात आत्मक्लेश उपोषण करण्यात येईल असा इशारा शिव राष्ट्र सेना पक्षाचे पक्षाध्यक्ष संतोष नवसूपे यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे दिलाय. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक,आणि तोफखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी ही पाठवण्यात आल्या आहेत.