जी एच रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फी अभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद

बंद केलेले विद्यार्थ्यांची फी कमी करा,अन्यथा उपकेंद्रात आंदोलन - नितीन भुतारे

अहमदनगर (वैष्णवी घोडके)
                                   नगर तालुक्यातील चास या भागातील जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट येथील विद्यार्थ्यांची फी भरली नाही म्हणून ऑनलाइन शिक्षण बंद केलेले असल्यामुळे सदर सर्व विद्यार्थ्यांनी मनसेचे नितीन भुतारे यांच्याकडे आपली तक्रार केल.   त्यानंतर नितीन भुतारे आणि  विद्यार्थ्यांच्या वतीने सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचे उपकेंद्र   येथे या संबंधी या संपूर्ण प्रकाराबाबत निवेदन देण्यात आले.

 

 

                                    व या निवेदनामध्ये  विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने या कॉलेजकडून फी साठी तगादा लावला जातो शिक्षण बंद केले जाते मग शासनाच्या नियमानुसार लॉकडाऊन काळात फी वाढ करायची नाही परंतु सदर कॉलेजने मागील वर्षापासून जवळपास अकरा हजार रुपये फी वाढ कारण्यातआलेली आहे.  त्यामुळे  हि फी वाढ रद्द करून वार्षिक फी मध्ये सुध्दा कपात करावी.  तसेच  पालकांचे  रोजगार आत्ताच सुरू झाल्यामुळे  सदर फी  शासनाच्या आदेशानुसार कमी करून व टप्प्याटप्प्याने घेण्यात यावी.  तसेच शासन नियमाप्रमाणे फक्त ट्युशन  फी घेण्यात यावी.  अश्या सर्व मागण्यांचे निवेदन  सर्व विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन नितीन भूतारे यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे उपकेंद्र  येथे उपसंचालकांना दिले.

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राइब करा.

 

 

                                निवेदनात म्हंटल्याप्रमाणे  सदर प्रश्नावर आपण ताबडतोब लक्ष घालून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू करावे व तसेच मध्ये कपात करून सर्वसामान्य पालकांना विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.  अन्यथा मनसेच्या वतीने आपल्या दालनासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील  देण्यात आलाय.  यावेळी कॉलेजचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच मनसेचे संकेत व्यवहारे,  गणेश मराठे,  आदी उपस्थित होते.