जिल्ह्यात आज 2233 नवीन रूग्णांची भर ; येत्या आठवडाभरात सक्रिय रुग्णाची संख्या जाणार 15 हजारांवर.

आठवडाभरात सक्रिय रुग्णाची संख्या जाणार 15 हजारांवर

जिल्ह्यात चोवीस तासात 2233 नवीन बाधितांची भर

नगर : मिनी लॉकडाउनच्या निर्बंधानंतरही करोनाचा प्रादुर्भाव थांबण्यास तयार नसून आज पुन्हा नगर जिल्ह्यात धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.
नगर जिल्ह्यात चोवीस तासात 2233 नवीन बाधितांची भर पडली आहे. यात सर्वाधिक 611 रुग्ण नगर शहरात आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे- नगर मनपा- 611, कर्जत201, संगमनेर-198, नगर ग्रामीण-187, अकोले-128, राहाता-117, पाथर्डी-114, राहुरी-107, शेवगाव-103, कोपरगाव-99, श्रीरामपूर-79, पारनेर-70, नेवासा-55, भिंगार छावणी मंडळ-54, जामखेड-47, श्रीगोंदा-40, इतर जिल्हा-17, मिलिटरी हॉस्पिटल-6. जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 859, खासगी लॅबमध्ये 549 तर रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 825 नवीन बाधित आढळून आले आहेत. (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आठवडाभरात सक्रिय रुग्णाची संख्या जाणार 15 हजारांवर

जिल्ह्यातील कोरोनाच्या सक्रीय रुग्णाची संख्या येत्या आठवडाभरात १५ हजारच्या पुढे जाईल असे तज्ञांचे अंदाज आहे .

सक्रीयांपैकी ५० टक्के रुग्णांना ऑक्सिजन बेड , व्हेटीलेटरची , गरज भासणार आहे .

त्यादृष्टीने त्य्दृष्टीने जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या आदेश देण्यात आले आहेत .

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता दुकाने बंद ठेवण्याचा निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले  यांनी स्पष्ट केलंय