कोरोनाला हरवण्यासाठी आपल्याला लसीकरण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. लसीकरणासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशात लसीकरण केंद्रे उभारली आहेत. प्रत्येक शहरात मनपाची अधिकृत लसीकरण केंद्रे आहेत. तसेच लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यात सुरु असल्याने, लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. लोक माहिती नसल्यामुळे लांबून लांबून लसीकरणासाठी येत आहेत. परिणामी नागरिकांना अनेक त्रास सहन करावं लागतो. यासाठी सरकारने आपल्या जवळचे लसीकरण केंद्राविषयी माहिती करून घेण्यासाठी नवीन प्रणाली आणली आहे.
हे ही पहा, आणि चॅनेल सबस्क्राईब करा …..
नागरिकांना आपल्या जवळच्या लसीकरण केंद्राविषयी माहिती घेण्यासाठी फार काही कष्ट घेण्याची गरज नाही. फक्त आपल्या मोबाईल मध्ये Mygov Corona Helpdesk +९१ ९०१३१५१५१५ हा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करा. किंवा bit.ly/Mygov-Corona_whatsapp या लिंक वर क्लिक करून संकेतस्थळाला भेट द्या. लसीकरणाबाबत कोणतेही गैरसमज बाळगू नका. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून लसीकरणापासून वंचित राहू नका. तर लसीकरणासाठी सज्ज व्हा. लसीकरणाविषयी अधिक माहिती साठी +९१ ११२३९७८०४६ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा. किंवा १०७५ या टोल फ्री नंबरवर ही तुम्ही संपर्क साधू शकता. कोरोना प्रतिबंधक लसीकरण, नोंदणी किंवा अधिक माहितीसाठी, ncov2109@gmail.com. या संकेतस्थळावर भेट द्या.