वॅक्सीन वाटप करताना राजकीय दबावाला बळी पडू नका

सावेडी उपनगरात वॅक्सीन केंद्र वाढवा

 

अहमदनगर

 

          उपनगरातील लोकसंख्येच्या दृष्टीने विचार करता सावेडी उपनगरा मध्ये आणखी दोन वॅक्सीन केंद्र वाढवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा. आयुक्त साहेब यांच्याकडे केली.उपनगर हे मोठया प्रमाणात वाढलेले असून उपनगराची लोकसंख्या ही जास्त आहे अशा परिस्तिथी मध्ये वॅक्सीन केंद्र एकच असल्यामुळे नागरिकांची मोठी कुचबना होत आहे.

 

  हे ही पहा आणि चॅनेल  सबस्क्राईब करा 

 

     वास्तविक पाहता वॅक्सीन पुरवठा ही या केंद्राला जास्त देण्याची आवश्यकता असतांना कमी पुरवठा केला जातो त्यामुळे नागरिक सकाळीच येऊन केंद्रावर लाईन लावतात व पुरवठा कमी झाल्यामुळे त्यांना मागारी फिरावे लागते हे रोजचेच झाले असून या मध्ये स्रिया व जेष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.

 

 

       सदर बाबी कडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता उपनगरा मध्ये आणखी दोन केंद्राची आवश्यकता आहे. जर केंद्राची संख्या वाढवली तर आहे त्या केंद्रावरील गर्दी कमी होईल व त्यामुळे भांडण तंटे होणार नाहीत  याची प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

 

 

 

महानगरपालिकेने वॅक्सीन वाटप करतांना कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता केंद्राची परिस्थिती लक्षात घेऊन वॅक्सीन चे वाटप करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केली.