व्यापाऱ्यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

पोलीस निरीक्षकाने मारली व्यापाऱ्याच्या थोबाडीत

राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिनांक २५ जुलै रोजी दुकान बंद करण्याच्या कारणावरून शहरातील एका प्रतिष्ठित व्यापार्‍यांच्या मुसकाडीत मारली. या घटनेमुळे व्यापार्‍यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून जबरदस्त घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी अहमदनगर जिल्ह्यात सायंकाळी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवावी. तसेच शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फू ठेवण्याचे आदेश दिले होते.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

मात्र रविवार दिनांक २५ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान जिल्हाधिकारी यांचे आदेश धुडकावून शहरातील अनेक व्यापार्‍यांनी आपली दुकाने चालू ठेवली होती. पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे नवीपेठून जात असताना बस स्थानक परिसरातील भोले प्रसाद हे मिठाईचे दुकान चालू असलेले पाहिले. त्यावेळी त्यांनी दुकानचे मालक दत्तात्रय खेडेकर यांना दुकान बंद करण्यास सांगितले. यावेळी शाब्दिक वाद झाल्याने पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दत्तात्रय खेडेकर यांच्या मुसकाडीत मारली. घटनेनंतर काही व्यापार्‍यांनी व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन ठिय्या आंदोलन करत आक्रमक होऊन जबरदस्त घोषणाबाजी केली.

 

 

 

 

 

पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी माफी मागावी. अशी मागणी व्यापार्‍यांनी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्याने सदर प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. या घटनेची तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.