सावली संस्थेतील मुले भारावले सैनिकांच्या शौर्याने

अनाथ मुलांसह माजी सैनिकांचा कारगिल विजय दिवस साजरा

अहमदनगर

नगर शहरातील माजी सैनिकांनी एकत्र येऊन केडगाव येथील सावली संस्थेतील अनाथ मुलांसह  कारगिल विजय दिवस साजरा केला. माजी सैनिकांनी मुलांना सैन्यात दाखल होण्यासाठी प्रेरित करुन मार्गदर्शन केले. सिमेवर असताना आलेले अनुभव विशद केले. तर कारगिलबद्दल माहिती जाणून घेत सैनिकांच्या शौर्याने मुले भारावली.

 

  हे ही पहा आणि चॅनेल  सबस्क्राईब करा 

 

प्रारंभी सावली संस्था व माजी सैनिकांच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त जवानांच्या शौर्याला सलाम करुन शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त कॅप्टन रावंत साळवे, माजी सैनिक नागेंद्रकुमार सिंग, सुभाष गंगावणे, ईश्‍वर गपाट, संतोष धोत्रे, अरुण मेहेत्रे, राजा ठाकूर, एसबीआय बँकेचे व्यवस्थापक रामराव मुनेश्‍वर, विवेक कुमार, पंकज कुमार, समाधान घोगरे, सरोज चौधरी आदी उपस्थित होते.

 

 

 

सेवानिवृत्त कॅप्टन रावंत साळवे म्हणाले की, अनाथ मुले हे समाजातील घटक असून, त्यांच्या सोबत कारगिल विजय दिवस साजरा केल्याचा आनंद होत आहे. या लहान मुलांना भारतीय सैन्याबद्दल माहिती देऊन लष्करमध्ये भरती होऊन देश सेवा करण्याची त्यांना प्रेरणा देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. माजी सैनिक नागेंद्रकुमार सिंग यांनी भारतीय सेनेतील विविध संधी बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. सावली संस्थेचे नितेश बनसोडे जवान हे देशाचे भूषण आहे.

 

 

 

कारगीलचा विजयी लढा प्रत्येक भारतीयांना स्फुर्ती देणारा आहे. जवानांच्या योगदानामुळे प्रत्येक भारतीय सुरक्षित असून, त्यांच्या उपकाराची परतफेड करता येणार नसल्याची भावना व्यक्त केली. उपस्थित माजी सैनिकांना बनसोडे यांनी पसायदानचे पुस्तक भेट देऊन त्यांचा सन्मान केला. माजी सैनिकांच्या वतीने सावली संस्थेतील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.