गळ्यात घातला कुत्र्याचा पट्टा, रस्त्यावर फिरायला लावलं, हे कसलं वागणं
सोशल मिडीयावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक किती खालच्या थराला जातात याचं एक उदाहरण समोर आलंय. सोशल मिडीयावर नाना प्रकारचे रील्स बनवून ते अपलोड केले जातात. त्यामधून जास्तीत जास्त लाईक, कमेंट मिळावे यासाठी काही वेळा बीभत्स, किळस आणणारे व्हिडीओ पोस्ट करत असतात. असाच एक किळसवाणा व्हिडीओ सोशल मध्यवर व्हायरल झालाय. मुंबई लगत असलेल्या मीरा भाईदर शहरातला हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून एका युजरने ‘ही घाण भारतात पोहोचली’ अशी कमेंट दिलीय.मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये दोन महिला दिसत आहेत. एका महिलेने मोनोकिनी ड्रेस घातला आहे. तर, दुसरीने डोक्यावर टोपी असलेला पूर्ण गाऊन घातला आहे.स्त्यावर विचित्र कृत्य करताना या महिला कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. मोनोकिनी घातलेली स्त्री रस्त्यावर कुत्र्यासारखी गुडघ्यावर चालत आहे. तर, गाऊनमधील महिला तिच्या गळ्यात कुत्र्याचा लांब पट्टा घालून तिला ओढत आहे. कोणीतरी आपल्या पाळीव कुत्र्याला साखळीने बांधून रस्त्यावर फिरत आहे असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधील दोन्ही महिला विदेशी आहेत. त्यांच्या या कृत्याचा एकाने व्हिडीओ बनविला आणि तो सोशल माध्यम X वर पोस्ट केलाय. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्याने या व्हिडीओला ‘This shit reach India’ अशी कॅप्शन दिलीय. हा व्हिडिओ झपाट्याने शेअर होत असून लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत.