चुकीला माफी नाही! हिशेब चुकता करायला मी येतोय; निलेश राणेंच्या सभेची जोरदार पोस्टरबाजी निलेश राणे यांची जोरदार बॅनरबाजी

: भाजपचे (BJP) माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांची शनिवारी, 16 फेब्रुवारीला सभा होणार आहे. नितेश राणे यांची भास्कर जाधवांच्या (Bhaskar Jadhav) गुहागर (Guhagar) मतदारसंघात तळी (Tali) येथे सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या निमित्ताने निलेश राणे यांची जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. निलेश राणे याचे बॅनर मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथे लावण्यात आले आहेत. विषेश म्हणजे या बॅनरवर ‘टायगर कमिंग बॅक’ असंही लिहिण्यात आलं आहे. निलेश राणेंचे हे बॅनर भास्कर जाधवांच्या कार्यालयाजवळ लावण्यात आले आहेत. निलेश राणे यांच्या जाहीर सभेसाठी तळकोकणासह कोकणातून जवळपास साडेतीनशे कार्यकर्त्यांच्या गाड्या येणार आहेत. भास्कर जाधव आणि राणे यांच्यातील 11 वर्षापासूनचा राजकीय संघर्ष पाहायला मिळत असून हा अद्यापही कायम आहे. निलेश राणे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर उबाठाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर पोलिस संरक्षण वाढवण्यात आलं आहे. भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात निलेश राणेंची जाहिर सभा असल्याने पोलीस प्रशासन कामाला लागलं आहे. भास्कर जाधवांनी राणे पिता-पुत्रांवर टीकेला प्रतिउत्तर देण्यासाठी निलेश राणेंनी जाहिर सभा आयोजित केली आहे.