लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी संविधान दिन साजरा करणे आवश्यक – डॉ. आर. जे. बार्नबास
अहमदनगर महाविद्यालयात संविधान दिन साजरा
नगर- वैयक्तिक हक्काचे संरक्षण करण्यासाठी, शासनाला काम करण्यासाठी एक चौकट प्रस्थापित करण्यासाठी, स्थिरता प्रदान करण्यासाठी, नागरिकांच्या सहभाग प्रोत्साहन देण्यासाठी, अत्याचारापासून नागरिकांना संरक्षण करण्यासाठी, संविधानाची आवश्यकता आहे. भारतीय राज्यघटना न्याय,स्वातंत्र्य ,समता आणि बंधुभाव याची खात्री देते .ही मुख्यत्वे देशाच्या लोकशाही मूल्यांचे समर्थन करणारी आहे. तसेच जगातील मोठी लिखित राज्यघटना आहे. म्हणून भारतीय संविधान हे महत्त्वपूर्ण आपणासाठी महत्व पूर्ण आहे.देशातील प्रत्येक नागरिकांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे, कारण भारतातील 142 कोटी विविधतेने नटलेल्या लोकसंख्येला एका धाग्यात ठेवण्याचे काम राज्यघटनेने केले आहे. या राज्यघटनेमध्ये आपले विविध स्वरूपाचे स्वातंत्र्य,अधिकार आणि कर्तव्य लिखित स्वरूपात देण्यात आलेले आहे.त्या मुळे आपणआपले मत निर्भीडपणे मांडू शकतो. आपल्या मूलभूत अधिकाराचा वापर ढाल म्हणून करू शकतो आणि आपले मूलभूत कर्तव्य जबाबदारीने पालन करतो . या सर्व गोष्टीसाठी भारतीय ‘संविधान दिवस’ साजरा करतात .असे प्रतिपादन प्राचार्य डॉ .आर. जे. बार्नबस यांनी केले.
मा. गांधी अभ्यास केंद्र, राज्यशास्त्र विभाग आणि करिअर कट्टा अंतर्गत अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी घटनेच्या ‘उद्देश पत्रिकेचे वाचन प्रा .डॉ विलास नाबदे (राज्यशास्त्र विभाग ) यांनी केले . यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीपकुमार भालसिंग, प्रा.डॉ. नोयल पारगे, प्रा.डॉ. प्रितम कुमार बेदरकर ,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा .विनीत गायकवाड, कायम विनाअनुदान विभाग विभाग प्रमुख प्रा.डॉ .सय्यद रज्जाक, महाविद्यालयाचे रजिस्टर पिटर चक्रनारायण .विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. भागवत परकाळ ,राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा डॉ .पोपट सिनारे आणि राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रो सुधीर वाडेकर. आणि महाविद्यालयातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक ,समन्वयक, शिक्षकेतर कर्मचारी गांधी अध्ययन केंद्राचे कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थी विकास मंडळ ,करिअर कट्टा ,राज्यशास्त्र विभाग व गांधी अध्ययन केंद्राच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.