एकनाथ शिंदे म्हणजे काळजीवाहू नेतृत्व: मुख्यमंत्री पदासह मंत्रिमंडळाचा राजीनामा

नव्या नेतृत्वाबाबत मात्र पेच अजूनही कायम

विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळूनही अंतर्गत वादामुळे महायुतीचे नेते अजूनही नव्या मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर करू शकलेले नाहीत भाजपचे केंद्रीय नेते आपलाच मुख्यमंत्री बनवण्यावर अजूनही ठाम आहेत तर एकनाथ शिंदे ही आपला दावा सोडण्यासाठी तयार नाही यामुळे युतीत शीत युद्ध निर्माण झाले आहे का असा सवाल आता तज्ञ मंडळी विचारू लागलेली आहेत तसंच तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या कोर्टात आता हे प्रकरण गेलेले असल्याने 24 व्या विधानसभेचा कार्यकाळ हा 26 नोव्हेंबर रोजी संपलेला असूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला मात्र नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्याकडे राज्यपालांनी जबाबदारी सोपवलेली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सर्व महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे.