दिल्ली येथील वाल्मिकी समाजातील ९ वर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे- शिवराष्ट्र पक्षाची मागणी

काळ्या फिती लावून घटनेचा केला तीव्र निषेध ;जिल्हा अधिकाऱ्यांना दिले निवेदन

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

 

दिल्लीतील नांगल भागात नऊ वर्ष वयाच्या एका दलित मुलीवर बलात्कार तसेच तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ह्या घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर येथील शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने इंपिरियल चौकातील शिवाजी पुतळ्या जवळ काळ्या फिती लावून घोषणाबाजी करण्यात आली. आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

 

 

 

 

दलित व वाल्मिकी समाजाच्या या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करू, असे शिवराष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष श्री.संतोष नवसुपे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराजांनी जात-पात , धर्म न बघता स्त्रियांविषयी आदर बाळगला, आम्हाला पण तीच शिकवण दिली. परंतु,ह्या नराधमांना त्याची जाणीव नाही, त्यांना शिक्षा देतांना त्या पीडितेला झालेल्या वेदनेचा विचार करून ह्यांनाही तश्याच प्रकारे हात, पाय कापून ह्यांचे गुप्तांग हि कापून टाकले पाहिजे, अश्या कठोर शब्दात त्यांनी आपले मत मांडले,

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

ह्या वेळी शिववराष्ट्र पक्षाचे जिल्हाध्याक्ष संतोष नवसूपे, माजी नगरसेवक अनिल शेकटकर, शहराध्यक्ष अक्षय कांबळे, भिंगार शहराध्यक्ष राकेश सारवान ,भिंगार शहर  उपाध्यक्ष  कुणाल बैद, सिद्धांत बिलार, अतुल अपील, मुकेश हंस, पपा लखन , राजीव वाडेकर, आनंद बग्गन,प्रवीण बग्गान, अखिल भारतीय मेहेतर समाज संघटना अध्यक्ष सनी  खरारे,अखिल भारतीय मेहेतर समाज संघटना उपाध्यक्ष राहुल लखन ,अतुल नखवाल, हे शिवराष्ट्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.