शिवसेना संपर्कप्रमुखांच्या स्वीय सहायकाला केले  व्हाट्स अप व्हिडीओ कॉलद्वारे  ब्लॅकमेल 

अश्विन सातपुते यांना मागितली ७००० ची खंडणी: मुंबई सायबर क्राईम सेल मध्ये गुन्हा दाखल

मुंबई(प्रतिनिधी): शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांचे स्वीय सहायक अश्विन सातपुते यांना व्हाट्स अप व्हिडीओ कॉल द्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार घडलाय . याप्रकरणी अश्विन सातपुते यांनी मुंबई पोलीस आयुक्त तसेच सायबर सेलकडे रीतसर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे.

आता पोलीस आरोपींचा शोध घेत असून सायबर सेलची यंत्रणा यासाठी कामाला लागली आहे. या तक्रारीच्या आधारे अशा अश्लील व्हिडीओ कॉल द्वारे हनीट्रॅप मध्ये अडकवून ब्लॅकमेल करणारे मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

असा असतो हनीट्रॅप

 व्हाट्स अप फेसबुक आणि इन्स्टाद्वारे अश्लील व्हिडीओ कॉल करून हनीट्रॅप द्वारे सावज हेरले जाते . आणि याच व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डिंग करून त्याद्वारे ब्लॅकमेल केले जाते .  त्या आधारे पीडित पुरुषाकडून  मोठी रक्कम वसूल केली जाते . मागील काही दिवसापासून असे गंभीर प्रकार वारंवार घडत आहेत . याबाबत पोलीस यंत्रणा आता सतर्क झाल्या आहेत.  सायबर सेल ने याचे पुरावे गोळा करून आरोपींच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन ट्रॅक करण्यास सुरुवात केली  आहे. तसेच सर्व व्हिडीओ कॉल , फोन कॉल , व्हाट्स अप फेसबुक व्हॉइस व व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली आहे.

   सत्ताधारी शिवसेना नेत्याच्या स्वीय सहायकालाच अडकवले जाळ्यात

शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांचे स्वीय सहायक अश्विन सातपुते हे दिनांक ३१ डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ९७०७३४३६९३ या नंबर वरून व्हाट्स अप व्हिडीओ कॉल आला . तो कॉल सातपुते यांनी उचलला असता सातपुते यांचा चेहरा त्या व्यक्तीस दिसू लागला . त्यावेळी ती स्त्री नग्न अवस्थेत होती . फोनवर बोलताना ती अश्लील भाषा वापरू लागली .

    ALSO WATCH THIS

हा प्रकार पाहून घाबरलेल्या अश्विन सातपुते यांनी फोन कट केला . त्यानंतर पुन्हा माझ्या सिमकार्ड नंबरवर १० मिनिटांनी एका व्यक्तीने कॉल केला  व त्याने मागच्या व्हिडीओ कॉल द्वारे तुझे त्या मुलीशी झालेले संभाषण व अश्लील चित्रीकरण  आम्ही रेकॉर्ड केलेले आहे. याद्वारे आम्ही तुझी बदनामी करू शकतो हे प्रकरण जर मिटवायचे असेल आणि तुझी बदनामी थांबवायची असेल तर तुला आत्ताच्या आत्ता ७००० रुपये द्यावे लागतील अशी मागणी तो व्यक्ती करू लागला .

  सामान्य युवकांना केले जातेय सावज 

वारंवार तो फोन करून पैसे न दिल्यास बदनामी करून आयुष्य उध्वस्त करण्याच्या धमक्या देतो आहे.   असे प्रकार आता वारंवार घडत असून यात अनेक युवक या हनीट्रॅप मध्ये अडकत आहेत. हनीट्रॅप रॅकेट मधील आरोपी पीडित युवकांकडून लक्षावधी रकमा वसूल करीत आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी आरोपीना अटक करण्याची मागणी होत असतांना आता खुद्द सत्ताधारी शिवसेना नेत्याच्या स्वीय सहायकालाच हनीट्रॅप मधे अडकविण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यास सुरुवात केली आहे . सातपुते यांनी आपल्या तक्रारीच्या प्रति   राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , गृहमंत्री अनिल देशमुख यांनादेखील पाठविल्या आहेत .