जागरूक नागरिक मंचाने कोरोना योध्यांना दिली व्हायरोशील्ड स्प्रेची ढाल

आमदार संग्राम जगताप , सभापती अविनाश घुले यांच्या हस्ते वाटले स्प्रे

https://metronews.co.in/valentines-day/
नगरच्या नागरिकासासाठी कोरोनाकाळात उपयोगी उपक्रमांची मालिका देणाऱ्या जागरूक नागरिक मंचाने एक अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांच्या संकल्पनेतुन नगरच्या कोरोना योध्यांना व्हायरोपशील्ड स्प्रेची ढाल मिळणार आहे. कोरोना संसर्गापासून रोखण्यासाठी हे जालीम औषध आहे. ज्या कोरोना योध्यांनी अद्याप लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेले नाही त्यांना हा स्प्रे खूप उपयोगी आहे.

 

Also See This And Subscribe

 आ. संग्राम जगताप,   सभापती अविनाश घुले यांच्या हस्ते या स्प्रे च वाटप झाले.   फ्रंट लाईन कोरोना वोरीयर्स ना हे वाटप करण्यात आलं.  मनपाच्या वतीने आरोग्य अधिकारी डॉ. सुज्योत सैंदाणे यांनी या स्प्रेचा स्वीकार केला .
                आमदार संग्राम जगताप यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे हे याबाबतीत नेहमीच जागरूक भूमिका बजावत आहेत. त्यांच्या कुटुंबियांवर कोरोनाने वेळोवेळी आघात केला . त्याची मोठी किंमत त्यांनी मोजली तरीदेखील दोन वर्षे कोरोना योध्याप्रमाणे त्यांनी रस्त्यावर उतरून त्यांनी कोरोना सुरक्षा रक्षकांना त्यांनी मदतीचा हात दिला. कोरोना काळात जे आपला जीव धोक्यात घालून आपल्या घराबाहेर पडून जे काम करीत आहेत. त्यांचे कौतुक आहे. आणि जे घरात बसलेले आहेत ते देखील कौतुकास्पद आहे. कोरोना काळात नगरकर मधील सर्व समाज घटकांनी सुरु ठेवलेल्या मदत कार्याचे जगभरातून कौतुक होते आहे. त्याचा आपणास अभिमान आहे.

घुले देणार १५ स्प्रे जागरूक नागरिकला भेट 

अविनाश घुले म्हणाले की , कोरोना योध्याना हा स्प्रे मोफत उपलब्ध करून देणे हे कार्य उल्लेखनीय आहे.   मंचाच्या या उपक्रमाला सहाय्य म्हणून १५ स्प्रे आपण भेट अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
                   सुहास भाई मुळे यांनी हा स्प्रे कोरोना रोखण्यासाठी खूपच उपयोगी आहे.  नगरमधील सर्वच कोरोना योध्यांना हा स्प्रे देण्याचा आपला मानस असून त्यासाठी नगरकरांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले .  अवघ्या २०० रुपयांचा हा स्प्रे आहे.  आणि २५ स्प्रेची व्यवस्था प्रायोजकानी केली आहे .
              जगविख्यात कॅडीला कंपनीने हा स्प्रे काढला आहे.  आपल्या प्रयत्नातून तो नगरमध्ये उपलब्ध झाला.
नगरमधील सर्व कोरोना लसीकरण केंद्र , चाचणी केंद्र, कोविड सेंटर तसेच जिल्हा रुग्णालय व अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचे वाटप होणार आहे.  तेव्हा दानशूर व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन मुळे यांनी केले .  यावेळी जागरूक नागरिक मंचाचे सचिव कैलास दळवी , नगरसेवक सचिन जाधव , प्रा. सुनील कुलकर्णी , प्रा. बी यु कुलकर्णी , राजेंद्र पडोळे , घर घर लंगर सेवेचे हरजीतसिंग वधवा, योगेश गणंगले उपस्थित होते.