केरळचा मकर विल्लकु महोत्सवाची सांगता

अय्यप्पा मंदिर परिसर उजळला लक्ष दिव्यांची रोषणाई

मूळच्या केरळमधील रहिवाशांनी नगरच्या सावेडी भागात बांधलेल्या अयप्पा मंदिरात सध्या दीपोत्सव सुरू आहे. दोन महिन्यांचा मकर विल्लकु महोत्सव येथे सुरू झाला आहे. यानिमित्त दोन महिने येथे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. याची सरुवात म्हणून इथे  दीपोत्सव करण्यात आला .  आकर्षक अशा  विद्युत रोषणाईन मंद्री परिसर सजविण्यात आला होता .

 मकर संक्रांतीपासून दक्षिण भारतातील केरळी बांधव दोन महिन्यांचा मकर विल्लकु महोत्सव साजरा करतात .   यानिमित्त दोन महिने येथे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
        सावेडीच्या कुष्ठधाम रस्त्यावरील किंग कॉर्नरजवळ अयप्पा स्वामी मंदिर सुमारे २५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलंय . दक्षिण भारतीयांसह जगभरातील भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या केरळमधील शबरीमला येथील अयप्पा मंदिरातील धार्मिक उत्सवांसारखे उत्सव येथे दरवर्षी होतात. येथील अयप्पा सेवा समितीने आयोजित केलेल्या दोन महिन्यांच्या मकर विल्लकु महोत्सवाला नुकतीच येथे सुरुवात झाली. यानिमित्त या मंदिरातील अयप्पा स्वामी, सरस्वती देवी व गणपती मंदिरांसह परिसरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. साठ दिवसांच्या या महोत्सवात रोज पहाटे साडेपाचपासून ते सायंकाळी सातपर्यंत पूजा-अर्चा व विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यात निर्मल दर्शन, अभिषेक, गणपती होम, प्रसन्न पूजा, अर्चना, निरांजन, अलंकार दर्शन, दीप आराधना, भजन व प्रसाद वाटप कार्यक्रम होणार आहेत. अयप्पा सेवा समितीचे अध्यक्ष के. के. शेट्टी यांच्यासह अन्य सदस्यांनी या महोत्सवाचे नियोजन केले आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी या महोत्सवाची सांगता होणार आहे.  दरवर्षी या मंदिराच्या वतीने  धार्मिक पद्धतीने सावेडी   परिसरात  मिरवणूक काढण्यात येते परंतु  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  हि मिरवणूक न काढता  महिलांनी हातात दिवे  घेऊन  फक्त मंदिराला प्रदक्षिणा  घातली.