Local crime branch exposed
नगर जिल्हातील कर्जत तालुक्यात मयत व्यक्तीच्या जागी बनावट व्यक्ती उभी करून जमिनीचे बनावट खरेदीखताद्वारे विक्री करून फसवणूक करणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले.
नगर जिल्हातील कर्जत तालुक्यात मयत व्यक्तीच्या जागी बनावट व्यक्ती उभी करून जमिनीचे बनावट खरेदीखताद्वारे विक्री करून फसवणूक करणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले. पुरुषोत्तम बापूराव कुरुमकर (वय 40 रा. लिपणगाव ता. श्रीगोंदा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. नगर जिल्हातील कर्जत तालुक्यात मयत व्यक्तीच्या जागी बनावट व्यक्ती उभी करून जमिनीचे बनावट खरेदीखताद्वारे विक्री करून फसवणूक करणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले.या जमीन खरेदीच्या व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने कर्जत पोलिस ठाण्यात पुरुषोत्तम कुरुमकर यांच्याविरुद्ध फिर्यादी दाखल झाली होती. या फिर्यादीवरून 420 465 467 468 471 472 120(ब) 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्यातील आरोपी अहमदनगर परिसरातील येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांना मिळाली होती. या माहितीआधारे श्री कटके यांनी पथकाला सूचना दिल्या.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून लालटाकी येथे पुरुषोत्तम कुरूमकर याला पकडण्यात आले.