कृषी पंपासाठी आता मिळणार मोफत

थकबाकी भरायची की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय सरकार मागील त्याला सौरऊर्जा पंप देणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र मोफत वीज देत असताना, थकबाकी भरायची की नाही? याबाबत प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील सुमारे चार लाख शेतकऱ्यांकडे साडेसात हजार कोटी थकबाकी आहे. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौर ऊर्जा तयार करण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी, यासाठी मागील त्याला सौर ऊर्जा पंप देण्यात येणार आहे. या योजनेसाठी आठ लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचेही सांगण्यात आले. सरकारच्या निर्णयाचे शेतकऱ्यांमधून स्वागत करण्यात येत आहे. मात्र आजच्या स्थितीत अनेक शेतकऱ्यांकडे कृषी पंपांची लाखोंची थकबाकी आहे. ही थकबाकी भरणा ही थकबाकी भरण्याबाबत महावितरण तर्फे वेळोवेळी कारवाई मोहिमा राबवण्यात आल्या तरीदेखील कृषी पंपांची शंभर टक्के वसुली महावितरण तर्फे करण्यात आलेली नाही. सरकारने आता मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. मात्र थकबाकीच्या वीज बिलांवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.