मातंग समाजाच्या वतीने महापौरांचा सत्कार

शेंडगे यांनी समाजाचा आणि नगरचा मान वाढवला

                        अहमदनगर च्या मातंग समाजाच्या वतीने, नगरच्या नवनिर्वाचित महापौर रोहिणी शेंडगे यांचा साडी, चोळी देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अनिल शेकटकर , भगवान जगताप , सुनील भोसले,  बाळासाहेब जगधने,  सुनील सकट,  साहेबराव खाते,  बेबीताई उमाप, उमा शेकटकर,  कुसुम जगधने,  उषाबाई वाघमारे, गणेश कटकर, अभय कटकर, प्रशांत चव्हाण, अजय पठारे आणि  समाज बांधव उपस्थित होते.

 

 

 

 

                  मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने महापौरांना वीर लहुजी वस्ताद साळवे  यांची मूर्ती देण्यात आली. आणि वस्तादांसारखे  काम करण्यासाठी प्रेरित केले.  या प्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे यांनी नगरचा आणि समाजाचा मान वाढवला आहे, हि प्रगती उत्तरोत्तर होत जाईल . असा विश्वास उपस्थितांच्या वतीने करण्यात आला. महापौर पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे उपस्थितांनी कौतुक केले. सत्कार केल्याबद्दल महापौर रोहिणी शेंडगे यांनी या प्रसंगी उपस्थित समाजबांधवांचे आभार मानले.