प्रभाग क्र. ९ सिद्धार्थ नगरमध्ये नागरी समस्या सोडवा..

लोकशाहीरांची जयंती साजरी करण्यात यावी...

                     नगरच्या सिद्धार्थ नगर , प्रभाग क्रमांक ९ मधील नागरी समस्या बाबत शिव राष्ट्र सेनेच्या माध्यमातून दलित आघाडी चे जिल्हाध्यक्ष अनिल शेकटकर यांनी महानगर पालिकेत महापलिक आयुक्तांना निवेदन दिले. या भागातील पिण्याच्या पाण्याची वेळ, नालेसफाई, ड्रेनेज लाईन, तसेच म्युनिसिपल कॉलनी मधील स्ट्रीट लाईट दुरुस्ती , रस्त्यावर पडलेले खड्डे, उघडे पडलेलं चेंबर, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती या सारख्या समस्या मांडल्या.

 

 

 

 

                      फेज २ अंतर्गत बसवण्यात आलेली पाण्याची पाईपलाईन लवकरात लवकर सुरु करण्यात यावी. तसेच येत्या १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साठे चौकातील त्यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे . रस्त्यावर आणि पुतळ्याभोवती लायटिंग बसवण्यात यावी . तसेच सालाबादप्रमाणे शामियाना, खुर्च्या आणि साउंड सिस्टीम देण्यात यावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी संबंधित अभियंत्याला सूचना करण्यात याव्या, अन्यथा शिव राष्ट्र सेनेला नागरिकांसमवेत रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा ही अनिल शेकटकर यांनी दिलाय.

 

 

 

 

 

                           यावेळी सिद्धार्थ नगर मधील , नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. या प्रसंगी शिव राष्ट्र सेना पक्षाचे पक्षाध्यक्ष  संतोष नवसूपे, जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, युवासेना प्रमुख शंभू नवसूपे, अनिल शेकटकर, बाळकृष्ण जगधने, यांच्यासह इतर पदाधिकारी आमी सिद्धार्थ नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.