ज्यांना मेसेज, त्यांना लस 

स्वदेशी लसींचे अंतिम चाचण्यांचे निष्कर्ष  सकारात्मक

मुंबई:
              कोरोना आजारावर दोन भारतीय कंपन्यांच्या लसीचे निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे. या डिसेंबर अखेर केंद्राकडून  परवानगी मिळाल्यास  जानेवारीपासून लसीकरण  सुरु केलं जाईल. ज्या नागरिकांना मोबाईलवर लसीकरणासाठी संदेश पाठवला जाईल त्यांनाच लसीचा डोस  दिला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिलीय. लाभार्थ्यांना मोबाईल वर तारीख आणि वेळ कळवली जाईल असेही ते म्हणाले. “कोवॅक्सिन” आणि “कोव्हीशील्ड” या स्वदेशी कंपन्यांच्या लसींचे अंतिम चाचण्यांचे निष्कर्ष  सकारात्मक आले आहेत. सर्वच वयोगटातील स्वयंसेवकांवर कुठलेही गंभीर किंवा प्रतिकूल परिणाम झाले नसल्याचे समोर आले. तसेच लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून प्राधान्य  क्रमही ठरवण्यात आलाय. पहिल्या टप्प्यात ११ कोटींपैकी ३ कोटी लोकांनां लस दिली जाणार आहे. त्यासाठी १६ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केलंय.
          पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाल्यांनतर सर्व ५० वर्षावरील नागरिकांना लस दिली जैलन असे ही टोपे यांनी स्पष्ट केल. तसेच मतदान किंवा पोलिओ साठी ज्या प्रमाणे बूथ उभारले जातात तसेच कोविड च्या लसीकरणासाठी बूथ उभारणार असल्याचे ही टोपे यांनी सांगितलं. मोबाईल वर मेसेज आल्यानंतर ओळखपत्र सोबत असेल तरच लसीकरण बूथ वर प्रवेश दिला जाणार आहे. लस  दिल्यांनतर रुग्णाला  ३० मिनिटे केंद्रावरच थांबावे लागणार आहे. त्यानंतर त्याला घरी सोडले जाईल. असेही टोपे म्हणाले.