प्रेमदान चौकात खोदलेल्या रस्त्याने केला चिखल

पाईप लाईन टाकणारा बेदरकार ठेकेदार

                नगरच्या प्रेमदान चौकात खोदलेला रस्ता परत बुजविताना ठेकेदाराने हलगर्जी पणा केला. आणि आता पाईप लाईन हा बुजवलेला रस्ता पुन्हा खचण्याच्या बेतात आहे. नगर शहरात प्रवेश करतानाचे हे दृश्य आणि या रस्त्याची अवस्था अपघातांना आमंत्रण देणारी ठरते आहे. याबद्दल पालिकेकडे इथली व्यावसायिक आणि वाहनचालकांनी तक्रार केली. पण त्याची दखल कोणीच घेतली नाही. हे या समस्येचं दुर्दैव आहे.

 

 

 

 

 

 

नगर शहरातल्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालीय. अमृत योजनेतील नवीन पाईप लाईन टाकण्याची कामे भर पावसात सुरू आहेत. उन्हाळ्यात पावसाळा तोंडावर असतांना नगरचे रस्ते दुरुस्त करण्यात आले होते. त्यावर डांबर ओतून रस्ते चकाचक देखील झाले होते मात्र पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली हे रस्ते पुन्हा खोदण्यात आले. पाईप लाईन टाकून रस्ते नव्याने खडीचा भराव  न टाकता फक्त रस्त्यावरील माती आणि चिखल टाकून बुजविण्यात आले. एक तर नवीन पाईप लाईन टाकताना जेसीबी चालकाने जुनी पाईप लाईन फोडून ठेवली त्यामुळे पाऊस असो वा नसो रोज पाणी सुटले की हे पाणी या बजावलेल्या रस्त्यातून वर येते , काही काळ पाण्याचे डबके साचते आणि त्यातून वाहने गेल्यानंतर या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असते. त्यातूनच वाहनचालक आणि पादचाऱ्यांना वाट काढावी लागते .

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

 

 

 

हॉटेल स्वीट होम आणि हॉटेल प्रेमदानसमोरच हा रस्ता अखंड खोदून नंतर थातुर मातुर पद्धतीने बुजविण्यात आला . आणि आता तो पुन्हा खचण्याच्या बेतात आहे. पालिकेने नगर मनमाड राज्य महामार्गावर येत असलेल्या प्रेमदान चौकातील रस्ता दुरुस्त करावा आणि पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असेल तर किमान पावसाळ्यात खडी टाकून रस्ता मजबूत करावा पालिकेच्या अभियंत्यांनी जबाबदारीने यात लक्ष घालावं अशी मागणी परिसरातील हॉटेल चालक आणि व्यावसायिक करीत आहेत.