नगरकरांना 500 रुपयात सिटीस्कॅन मोफत एन्जॉग्रफी एन्जोप्लास्टी

नगर शहरातील नागरिकांना अवघ्या 1500 हजार रुपयात एमआरआय सुविधा उपलब्ध करून दिली आहे उत्तर महाराष्ट्रात कोणत्याच महापालिकेकडे नाही असा प्रकल्प उभारण्यात आला आहे पुढील सहा महिन्यात नगरकरांना याच सेंटर मधून पाचशे रुपयात सिटीस्कॅन सुविधा मिळेल व जिल्हा रुग्णालयात वर्षभर नवीन क‌ॅथ लॅब उभारून मोफत एन्जोप्लास्टी व अंजॉग्रफी सुविधा दिली जाईल अशी घोषणा खासदार सुजय विखे यांनी सोमवारी केली महापालिकेच्या सावेडीतील सावित्रीबाई संकुलात मनपाच्या एमआयआय सेंटरचे उद्घाटन खा. डॉ. विखे यांच्या हस्ते झाले यावेळी महापौर रोहिणी शेंडगे स्थायी समिती सभापती गणेश कवडे माबक सभापती पुष्पा बोरुडे सभागृह नेता विनीत पाऊलबुद्धे आयुक्त पंकज जावळे माजी महापौर बाळासाहेब वाळके सचिन जगताप आदी सह शिवसेना शिंदे गट भाजप राष्ट्रवादी व काँग्रेसचे नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते खासदार विखे म्हणाले दहा वर्षाचे घडले नाही ते अवघ्या दोन वर्षात नगर शहरात झाली आहे व यासाठी आमदार संग्राम जगताप महापौर रोहिणी शेंडगे व सर्व नगरसेवकांच्या सहकार्य मिळाले आहे नगर बदलणार व चांगल्या दिशेने नेणार असून येत्या ५ वर्षात छत्रपती संभाजी नगर व नाशिक आदि नगरांचे नाव असेल असे काम आम्ही सर्व मिळून करणार आहोत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला