तिकडे न्यूमोनियाचा उद्रेक; जिल्ह्यात अलर्ट
अहमदनगर: कोरोना नंतर आता न्यूमोनियाने चीनमध्ये चिंता वाढवली आहे. चीनमध्ये न्यूमोनियाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मात्र जिल्ह्यात सर्व काही अलबेला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितले. सध्या आपल्याकडे न्यूमन याचे रुग्ण फार आढळून येत नाहीत, रुग्ण वाढण्याचे सध्या तरी दिसून येत नाही. असेही डॉ. घागरे म्हणालेत चीनमध्ये कोरोना नंतर न्यूमोनियाचा उद्रेक झाल्यामुळे आपल्याकडे हे आरोग्य यंत्रणेने सतर्क रहा व अशा सूचना राज्यात देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात न्यूमन याचा उद्रेक झाला, तर त्याला आटोक्यात ठेवण्यासाठी रुग्णालय सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. यात मनुष्यबळ ऑक्सिजन उपलब्धता, वेंटिलेटर उपलब्धता, अतिदक्षता विभाग सज्ज ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र जिल्ह्यात तरी सध्या अशी कोणतीही काळजी करण्यासारखी स्थिती नाही, असे डाग घोगरे यांनी सांगितले आहे.