मालवण भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर म्हणून मराठी अधिकारी असलेल्या प्रेरणा देवस्थळी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना शनिवारी तारूकर्ली येथे रियर ऍडमिरल प्रवीण नायर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. शुक्रवारी भारतीय नौदल प्रमुख एडमिरल हरी कुमार यांनी तिचे नाव जाहीर केले. देवस्थळी या मूळच्या मुंबईतल्या असून त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवीधर शिक्षण घेतले आहे. त्या 2009 मध्ये भारतीय नौदलात रुजू झाल्या. त्यांचा भाऊ देखील भारतीय नौदलात अधिकारी आहे. त्यांचा लग्न देखील नौदल अधिकाऱ्याशी झालेला आहे. नौदलात युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या देवस्थळी या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. नौदलातील महिला कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या व श्रेणी देण्याच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या पद्धतीने नौदलाने आपली सेवा, नैतिकता आणि मुल्ये जपत सर्व श्रेणीमध्ये लैंगिक समानतेला प्रोत्साहन दिले आहे.