• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Followers
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?

Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Wednesday, June 7, 2023
  • राज्य
    • नगर
    • इतर

Publisher Publisher -

  • Home
  • राज्य
    • All
    • इतर
    • नगर
    • पुणे
    • औरंगाबाद
    राज्य

    मंडईमध्ये भरदिवसा गोळीबार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

    crime

    दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनोद जमदारे यास जामीन मंजूर

    ahmednagar

    तुकाराम अडसूळ यांना सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

    Prev Next
  • सांस्कृतिक
Metronews
ahmednagardistrictnagar

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा..आमदार लंकेंकडे बोट

पारनेर लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे.

On Aug 20, 2021
Share
ऋषिकेश राऊत
अहमदनगर 
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या एका ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली असून पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या व्यापाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे. यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा तेथील आमदार निलेश लंके यांच्यावर असल्याचे त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगातून दिसून येते.

 

 

आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून देवरे यांनी पत्र लिहिलं आहे. मी लवकरच तुझ्या सोबत येत असल्याचे सांगत महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो. लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात. आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचा उल्लेख त्यांनी केला आहे. कोवीड लसीकरणावरुन आमदार निलेश लंके यांनी एका आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली. याचा उल्लेखही देवरे यांनी लंके यांचे नाव न घेता केला आहे.
त्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये त्या म्हणाल्या आहेत की,  महिला अधिकारी म्हणून होणारा त्रास, वरिष्ठांकडून केले जाणारे दुर्लक्ष, नोकरीत येताना केलेला निर्धार आणि प्रत्यक्षात झालेली निराशा असे सविस्तर कथन त्यांनी या क्लीपमध्ये केले आहे. मध्येच त्या हमसून हमसून रडतानाही ऐकू येतात. हीच आपली सुसाईट नोट समजावी, असेही त्या म्हणत आहेत. तर कधी धीराने लढण्याची शिकवण असल्याचे सांगत आहेत.

 

आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून सदर पत्र लिहिलं गेलं आहे. मी लवकरच तुझ्या सोबत येत असल्याचे सांगत महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो. लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात. आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘दीपाली तू हे कृत्य केल्याचे मला तेव्हा आवडले नव्हते. पण आता एकूण त्रास लक्षात घेता तुझ्याच पाठी यावे, असे वाटत आहे. महिला अधिकारी म्हणून लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात.
लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एका रथाची दोन चाके आहेत. मात्र, आपल्या चाकाने गती घेतली की घात झालाच समजा. कारण महिलांनी मागे राहणे हेच मनूने शिकविले. हे सगळे मनूचे अनुयायी आहेत. मग एकटीने वाट कशी चालायची? दीडशहाणी, आगाऊ अशी विशेषणे लावली जाणार. जो पर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आपल्याविरूद्ध उपोषण, मोर्चे, आंदोलने घडवून आणणार, असं या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.
 आता एकदाची निघून जावे वाटते सुसाईट नोटमध्ये यांची सर्वांची नावे लिहून ठेवावीत. पण पुन्हा वाटते की अरे ती सुसाईट नोट कोर्टाने खोटी ठरविली तर? मग हिरा बनसोडे सारखे फिर्याद कोणाकडे द्यायची? कधी वाटते बंदुक घेऊन सुसाट पळावे यांच्या मागे. पण नंतर वाटते पोथ्यांत सांगितले आहे तसे यांना माफ करावे. माझ्यासारखी एक महिला अधिकारी विझली तर राज्यातील सर्व पुरूष अधिकारी आणि लोकप्रतिनिधी महिला अधिकाऱ्यांना घाबरून वागतील. किंवा इतर अधिकारी ज्योतीसारखे फार धाडसाने वागू नये म्हणतील. साईड पोस्ट मागतील किंवा नोकरीच सोडतील, असे हुंदके देत त्यांनी म्हटले आहे. अजूनही बराच उल्लेख या क्लिप मध्ये आहे.
Post Views: 491
ahmednagarJyoti Dewaremaharashtramla nilesh lankerashtravdi congresViral Audio Clip
Share FacebookTwitterWhatsAppEmail

Prev Post

भारतातील ‘या’ मीनारीवर भाऊ-बहीण एकत्र जाऊ शकत नाही….

Next Post

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचे नाशिक प्रादेशिक उपायुक्त कार्यालया समोर सोमवारी उपोषण

You might also like More from author
ahmednagar

शिवराज्याभिषेक दिनी महाराजांना अभिवादन करून ,वंडर किड्स ने साजरा केला शाळेचा पहिला…

ahmednagar

अवघ्या महाराष्ट्राची कूस कृतार्थ झाली, किल्ले रायगड शहारला, शिवबा सिंहासनाधीश्वर…

nagar

अहमदनगरला आता अहिल्यादेवी यांचे नाव

ahmednagar

पाथर्डीत तरुणीचा गळा आवळून खुन

Prev Next

मनोरंजन

ahmednagar

केडगावला रंगला “होम मिनिस्टर कार्यक्रम

editor Mar 7, 2023 0

थांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन

Oct 16, 2021

क्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…

Oct 8, 2021

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..

Oct 6, 2021
Prev Next 1 of 32

Latest News

ahmednagar

शिवराज्याभिषेक दिनी महाराजांना अभिवादन करून ,वंडर किड्स…

editor 3 hours ago 0
Uncategorized

निमगाव वाघात जागतिक सायकल दिवस साजरा

editor 4 days ago 0
Uncategorized

राज्याभिषेक दिन सोहळा दादा चौधरी विद्यालयात साजरा

editor 4 days ago 0
Loading ... Load More Posts No More Posts
  • Home
  • राज्य
  • सांस्कृतिक
© 2020 - All Rights Reserved.
Website Design: Design and developed by KK Team