पिंपळे गुरव इथे क्रीडा क्षेत्रातील व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान 

शिवामृत ग्रुप गौरव पुरस्काराचे आयोजन

पिंपळे गुरव :

पिंपळे गुरव येथील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात क्रीडा क्षेत्रातील व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. ‘ड’ प्रभाग अध्यक्ष सागर अंघोळकर यांच्या हस्ते गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
सांगवी येथील शिवामृत ग्रुपच्या वतीने पिंपळे गुरव मध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात यावर्षीचा शिवामृत ग्रुप गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेविका उषा मुंढे, नगरसेविका चंदाताई लोखंडे, माऊली जगताप, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, माजी नगरसेवक राजू लोखंडे , माजी नगरसेवक राहुल जवळकर, संतोष धाडवे, सुनील देवकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शिवामृत ग्रुपचे संचालक दत्तात्रय भोसले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुनील साठे यांनी सर्वांचे आभार मानले.
             पुरस्कार मूर्ती पुढीलप्रमाणे : अनिल लोखंडे (कबड्डी, उत्कृष्ट क्रीडा संघटक), झांजरे एच. बी. (स्काऊट व गाईड, उत्कृष्ट शिक्षक), रवि मोरे (किकबॉक्सिंग, उत्कृष्ट क्रीडा संघटक), सुदेश गायकवाड (शिवकालीन कला जीवनगौरव), योगेश मोरे (कराटे, उत्कृष्ट क्रीडा संघटक), राकेश म्हसकर (मिक्स बॉक्सिंग, उत्कृष्ट क्रीडा संघटक), मिहीर नरवडे (क्रिकेट, उत्कृष्ट खेळाडू), विशाल कदम (दीर्घ अंतरावरील हौशी सायकलिंग पटू), दिपक लोकनादण (उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक), मिलिंद संधान ( अंतरावरील हौशी सायकलिंग पटू), मुकेश पवार (उत्कृष्ट क्रीडा शिक्षक), ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप (दीर्घ अंतरावरील हौशी सायकलिंग पटू)