पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यात

राज्य सरकारची घोषणा

महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-पिंक रिक्षा योजनेचा विस्तार, श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास, उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना, संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे विकास आराखडा तयार करून त्यास आवश्यक निधी देणार अशा अनेक घोषणा उपमुख्यमंत्री वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केल्या. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथील शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेस दोन कोटींचा निधी, जावळी तालुक्यातील शहीद तुकाराम ओंबाळे स्मारकास निधी, कोयना येथील मुनावळे येथे जल पर्यटनासाठी निधी देणार अशा घोषणा अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना पवार यांनी केल्या. समाजातील विविध घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर केल्याने आपण समाधानी आहोत आणि राज्यातील जनता ही खुश आहे. असेही ते यावेळी म्हणाले.महिला बालकल्याण राखीव निधीतून तरतूद करून अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वयंरोजगारात निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी दहा हजार पिंक ई-रिक्षा खरेदी योजनेची घोषणा त्यांनी केली. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार या योजनेचा विस्तार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बालकल्याणासाठी राखीव तीन टक्के निधीतून जिल्हा व तालुका स्तरापर्यंत करण्यात येईल. असेही सांगितले. यामधून प्रत्येक जिल्ह्यात 500 पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यात येतील. असेही पवार यांनी यावेळी सांगितले.