MMGL Press Conference

एमएनजीएलने आपल्या प्रवासाला २००६ मध्ये केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पालकत्वाखाली सुरूवात केली होती.

एमएनजीएलने आपल्या प्रवासाला २००६ मध्ये केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पालकत्वाखाली सुरूवात केली होती. भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियमन महामंडळाकडून (पीएनजीआरबी) एमएनजीएलला पुढील भौगोलिक परिसरांमध्ये गॅस वितरण प्रकल्प सुरू करण्यासाठी यंत्रणेचा पाया घालणे, बांधकाम, यंत्रणा कार्यान्वित करणे (आॅपरेशन) आणि विस्तार यासाठी प्राधिकृत करण्यात आले होते. महाराष्ट्रातील पुणे शहर आणि त्याला चाकणसह जोडलेला परिसर, तळेगाव, हिंजवडी, नाशिक, धुळे आणि सिंधुदुर्ग जिल्हे, कर्नाटकातील रामनगर जिल्हा आणि गुजराथच्या वलसाडचा काही भागाचा यामध्ये समावेश आहे. संपूर्णत: पर्यावरणपूरक इंधनाचे एकमेव वितरक म्हणून एमएनजीएलने आपल्या ध्येयाशी कटिबद्ध रहात स्वच्छ व पर्यावरणपूरक हरित इंधन- सीएनजीचा पर्याय, पेट्रोल, डिझेलसारख्या पारंपरिक इंधनाला उपलब्ध करून दिला आहे.  अशी माहिती  सुप्रियो हल्दर यांनी दिलीय .
एमएनजीएलने सीएनजीचे मोबाईल रिलिंगफि  युनिट सुरू करण्यासाठीही पुढाकार घेतला आहे .  अशाप्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी गॅसवाहिन्या नाहीत, अशा क्षेत्रांना जोडण्यासाठी या मोबाईल युनिटचा मोठा फायदा होणार आहे. दुचाकी क्षेत्रातील ग्राहकांना पर्यावरणपूरक इंधनाचा फायदा करून देण्यासाठी भारतातील काही नामांकित संस्थांबरोबर एमएनजीएल रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रकल्प विकसित करत आहे अस या प्रकल्पाचे अधिकारी राजेश पांडे यांनी सांगितलंय .