राज्यातील पोलीस वसाहतींचा प्रश्न लागेल मार्गी

गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांचे आश्वासन

जामखेड {प्रतिनिधी } : कर्जत जामखेड मधील पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लागला आहे तसाच राज्यातील सर्वच पोलीसांच्या वसाहतीचा प्रश्न महाविकास आघाडीचे सरकार मार्गी लावणार आहे. तसेच तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनचा व कर्जत जामखेड मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न  लवकरात लवकर मार्गी लागेल असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जामखेड येथिल पोलीस वसाहतीच्या भूमिपूजन प्रसंगी सांगितले   पोलीस निवासस्थानांचा भूमिपूजन समारंभ गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी आमदार रोहित पवार, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अधीक्षक अभियंता दिपाली भाईक, उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, तालुकाप्रमुख संजय काशिद, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश आजबे, राजेंद्र कोठारी, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, नगराध्यक्ष निखिल घायतडक, सुनील लोंढे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, जयसिंग उगले, राजेंद्र पवार, नगरसेवक दिंगाबर चव्हाण, अॅड हर्षल डोके, दादासाहेब सरनोबत, बिभिषण धनवडे, महेश निमोणकर, गजानन फुटाणे, लक्ष्मण ढेपे, अमित जाधव, शिवसेना तालुकाउपप्रमुख गणेश उगले, शहरप्रमुख गणेश काळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Also see this and subscribe 

 

 

 

 

यावेळी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, पोलीसांना चांगल्या सुविधा व चांगली घरे देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे सकारात्मक आहेत. राज्यातील पोलीसांच्या निवासस्थानांसाठी पावणेचारशे कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. कर्जत जामखेड मधील पोलीसांसाठी साडेपंधरा कोटी रुपयांच्या ७६ पोलीसांची निवासस्थाने १८ महिन्याच्या आत पुर्ण होणार आहेत. तसेच कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी जसे आरोग्य विभागाने काम केले तसेच शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे याबाबत पोलीसांनी महत्त्वाची भूमिका बजावली अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस बांधवांना पोलीस स्टेशन लगत हक्काचा निवारा या सदनिकेमुळे मिळणार आहे. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की, खर्डा पोलीस स्टेशनचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल.  यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, आपण नेहमी पोलीसांकडून चांगल्या कामाची अपेक्षा ठेवतो चांगल्या कामासाठी पोलीसांना चांगला निवारा असणे गरजेचे आहे. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारने पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लावला आहे. लवकरात लवकर महसूल व इतर अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लावू. सध्या तालुक्यातील वातावरण भयमुक्त झाले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या आगोदर मोठी दहशत होत होती. शहरातील वाहतूक कोंडीची अडचण सुटली आहे.
राज्य राखीव पोलीस दल केंद्र हे जामखेड मधून दुसर्‍या जिल्ह्यात गेले होते ते आपण परत जामखेडला आणले आहे. यामुळे जामखेडच्या वैभवात भर पडणार आहे. मुलींना व महिलांच्या अडचणी येऊ नयेत म्हणून आपण भरोसा सेल सुरू केले आहे.राज्यातील पोलीसांच्या  अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्यांना काम करण्यासाठी अधिक बळ मिळणार आहे. लवकरात लवकर जिल्ह्यातील पोलीसांसाठी नविन वीस गाड्या येणार आहेत.  यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, सरकारने आमच्या बांधवांसाठी निवासस्थानाची सोय केली आहे. तेव्हा आम्ही अधिक चांगल्या प्रकारे काम करू सर्व सामान्य लोकांना योग्य न्याय देऊ जामखेड मध्ये दोन अधिकारी व ३६ पोलीस निवासस्थाने होणार आहेत.जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने भास्कर पेरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांना देण्यात आले .  कार्यक्रमाचे आभार उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी मानले .

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.