रंगभूमी फाउंडेशन व कैलास झगडे फाउंडेशनचा उपक्रम

पुणे : रंगभूमी फाउंडेशन व कैलास झगडे फाउंडेशन या सेवाभावी संस्थांनी सौ अर्चनाताई झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली 26 जानेवारी ते 30 जानेवारी या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन  केलं होते. कोरणा नंतर आलेल्या  निराशावादी वातावरणातुन सर्वाना बाहेर काढण्यासाठी आणि   कलाकारांना नवी उमेद मिळावी म्हणून 26 जानेवारी रोजी वडगाव शेरी येथील सेंट जोसेफ कॉलनी येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला यावेळी आमदार सुनील टिंगरे, संदीप केदारी, डेव्हिड स्वामी ,विनोद तोरणे ,आदी उपस्थित होते . रंगभूमी फाउंडेशन व कैलास कार्यक्रमांमुळे कलाकारांना एक नवी उमेद मिळाली व नागरिकांचे मनोरंजन झाले . 27 जानेवारीला सामाजिक उपक्रम म्हणून नदीपात्रातील जागेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.

Also see this and subscribe

 

परिसरातील महिलांना एकत्र आणून त्यांचे मनोमिलन व्हावे म्हणून विठ्ठल नगर , वडगाव शेरी येथे अश्विनी ताई झगडे यांच्यातर्फे हळदी कुंकू व  मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी या सर्व कार्यक्रमाच्या वेळी आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, समाजसेविका शीतल  टिंगरे ,संतोष गव्हाणे, गणेश गलांडे, प्रवीण जगताप, विजय घनवट, तुकाराम नरवडे, बंटी पाडळे, सुनील गायकवाड, वाल्मीक सरतापे, निशा सुक्रे, नीलम अय्यर, संदीप नवले ,व वडगाव शेरी तील इतर मान्यवर उपस्थित होते .अशा कार्यक्रमांमुळे कलाकारांना एक नवी उमेद मिळते व सर्व नागरिकांचे मनोमिलन होते असे कैलास भाऊ झगडे यांनी यावेळी सांगितले.