राहुल मुथा यांना मानाच्या सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्काराने झाला गौरव

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ने घेतली मुथा यांच्या योगदानाची दखल शून्यातून ईशाची विश्वनिर्मिती

इशा एंटर प्रायजेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मुथा याना नुकताच  सूर्यगौरव राष्ट्रीय  पुरस्कार प्रदान करण्यात आला . मुथा हे पुण्यातील नामांकित उद्योजक आहेत . आपल्या ईशा एंटर प्रायजेसच्या माध्यमातून त्यांनी माध्यमातून होम आणि ऑफिस ऑटोमेशन व सेक्युरिटी सिस्टीम जगतात मोठा व्यवसाय उभा केला आहे.  या क्षेत्रात त्यांनी पुण्याचे नाव मोठे  केले . तंत्रज्ञान व्यवस्थापन क्षेत्रात त्यांनी  पुढाकार घेऊन हे यश मिळवले आहे. त्यांच्या या कामाची दखल  सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ने घेतली व त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.
  सूर्यदत्त चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .