देशभरात सणासुदीत धावणार ६ हजार विशेष रेल्वे
मागणी वाढल्यास संख्याही वाढेल : अश्विनी वैष्णव
दसरा दिवाळी अशा सणासुदीच्या काळात देशभरात जवळपास ६ हजार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. नवरात्र, दुर्गा पूजा, दिवाळी तसेच छठ पुजेसाठी १ कोटीपेक्षा जास्त प्रवासी सणांसाठी घरी जाऊ शकतील आणि आपल्या कुटुंबासोबत सणांचा आनंद घेऊ शकतील. सणांच्या या काळात खासगी वाहनांकडून बऱ्याच वेळा प्रवाश्याची लूट केली जाते. बस मध्येही या काळात मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या काळात जवळपास ६००० जास्त गाड्या सोडणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. यंदा ५,९७५ विशेष रेल्वे धावतील. मागणी वाढल्यास ही संख्यादेखील वाढेल,असेही वैष्णव म्हणाले.