राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचा आत्मक्लेष आंदोलन
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने थकबाकी आणि पेन्शन वाढीसह विविध प्रलंबित मागण्यासाठी 7 ऑक्टोबरला राज्यात एल्गार पुकारला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन या अंतर्गत केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन यासाठी करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे देयके महामंडळाकडे थकलेले आहेत. सर्व देयके तत्काळ अदा करावेत, शासन स्तरावर इपीएस 95 याबाबत योग्य तो निर्णय घेऊन, पेन्शनवाढ पासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळावा, कामगार करारात मंजूर झालेल्या तरतुदीनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाचे परिपूर्ती महामंडळाने करावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी मोफत पास मिळावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन वाढ आणि रजेच्या रोखीकरणाचे पैसे एक रक द्यावे अशा विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्ती कर्मचारी आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याची माहिती या संघटनेचे केंद्रीय सदस्य तथा जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे यांनी दिली आहे वेतन वाढ आणि रजेच्या रोखीकरणाचे पैसे अद्याप दिले गेलेले नाही हा भार अंदाजे तीनशे कोटी रुपयांचा असल्याचे यावेळी कुबडे यांनी सांगितले आहे नियमित कर्मचाऱ्यांना नुकतीच 2020 पासून नवीन वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढलेली वेतनश्रेणी महागाई भत्ता आणि घरभाडे अशी जी काही फरकाची रक्कम होईल ती एक रक्कमी मिळावी अशी ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठीच 7 ऑक्टोबरला राज्यात राज्य परिवहन निवृत्ती कर्मचारी संघटनेने आत्मक्लेष आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे.