जिल्हा विधी सेवा व इतर संस्थांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान

विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांचा गुलाब देऊन सत्कार

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अहमदनगर तसेच अहमदनगर आणि सेंट्रल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती मोहीम आज डी एस पी चौकात राबवण्यात आली. या अभियाना अंतर्गत वाहनधारकांना वाहतूक सुरक्षा नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. ज्या वाहनधारकांनी हेल्मेट, मास्क  घातले नव्हते त्या वाहनधारकांचे गुलाबपुष्प देऊन प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा. 

 

 

 

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी अभियानाविषयी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले,  वकील संघ अध्यक्ष ऍड. भूषण बऱ्हाटे, विधिसेवा सदस्य ऍड. विक्रम वाडेकर, विधिसेवा सदस्य ऍड. शिवाजी कराळे, ऍड. अनुराधा येवले, ऍड. सुनील  तोडकर, अधीक्षक राजकुमार मोरे, परमसागर, गवळी आणि पालवे उपस्थित होते.