सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 11 भाषांत ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन !

कोरोना महामारीमुळे यंदा ऑनलाईन कार्यक्रम होणार

           राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना धर्मसंस्थापनेचे कार्य याच गुरुशिष्य’ परंपरेने केले आहेभगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या आणि आर्य चाणक्यांनी सम्राट चंद्रगुप्ताच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन केले अन् आदर्श अशा धर्माधिष्ठित राज्यव्यवस्थेची स्थापना केलीसध्याही समाजराष्ट्र आणि धर्म यांची स्थिती दयनीय झाली आहेअशा वेळी जनतेचा छळ करणार्‍या लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढणे आणि रामराज्यासारख्या हिंदु राष्ट्राची स्थापना करणे ही काळानुसार श्रीगुरुसेवाचा आहेया उद्देशाने 23 जुलै 2021 ला सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जाणार आहेकोरोना महामारीमुळे यंदा ऑनलाईन कार्यक्रम होणार आहेत.

                मराठीहिंदीइंग्रजीगुजरातीकन्नडतेलुगुतमिळपंजाबीबंगालीओडिया आणि मल्याळम् या 11 भाषांमध्ये 23 जुलैला ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहेया महोत्सवांत श्रीगुरुपूजनसनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संग्रहित भागस्वसंरक्षण प्रात्यक्षिके (बचाव आणि आक्रमण), आपत्काळाच्या दृष्टीने करावयाची सिद्धता (चलचित्र), तसेच आत्पकाळात हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना याविषयी वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा.


गुरु म्हणजे कायगुरुंचे जीवनातील महत्त्वगुरुकृपा कार्य कशी करतेत्यासाठीचे मार्गदर्शन या महोत्सवात होणार आहेसध्याच्या महामारीच्या आपत्काळात दैवी बळाची मोठी आवश्यकता आहेत्यामुळे या महोत्सवात सहभागी होण्याने गुरूंचा आशीर्वाद लाभेलतसेच हिंदूंचे धार्मिक संघटनही होईलतरी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवाचा लाभ करून घ्यावातसेच आपले मित्रपरिवाररिचितनातेवाईक यांनाही याचे निमंत्रण द्यावेअसे आग्रहाचे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

     मराठी भाषेतील ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ हा 23 जुलैला सायंकाळी वाजता होणार असून तो यूट्यूबवर पहाता येईलत्याच्या लिंक्स पुढीलप्रमाणे :
1. Youtube.com/SanatanSanstha
2. www.sanatan.org/mr/

सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील पुढील लिंकवर अन्य भाषांमधील गुरुपौर्णिमा महोत्सवांविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे – https://www.sanatan.org/mr/gurupurnima