शरद पवारांच्या अर्जावर अजित पवारांची सही कशी?

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे? याप्रकरणी निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे? याप्रकरणी निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. यात शरद पवारांनी हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवला. तर अध्यक्ष पदाची निवडणूक तुम्ही का लढली नाही? असा सवाल शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामात यांनी अजित पवार गटाला विचारला. शरद पवारांच्या निवडणूक अर्जावर अजित पवारांची सही कशी? असेही विचारले. शरद पवार जितेंद्र आव्हाळे यांच्यासह अजित पवार गटातील नेत्यांच्या उपस्थितीत ही सुनावणी सुरू आहे. त्यात शरद पवार गटाचा बाजू मांडण्याचा 29 नोव्हेंबर हा शेवटचा दिवस होता. गुरुवारपासून अजित पवार गट बाजू मांडणार आहे. यापूर्वी शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर खोटी कागदपत्रे सादर करणे, राष्ट्रीय कार्यकारिणी सहभागी सदस्यांची खोटी माहिती देणे असे आरोप करण्यात आले होते. तसेच शरद पवार गटाच्या वतीने या प्रकरणी कायदेशीर कारवाई करत तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. प्रतिज्ञापत्र, खोटी कागदपत्रे याविषयी तेच ते मुद्दे मांडत असल्याबद्दल आयोगाने शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंगवी यांना फटकारलेही होते.