सौर पंपाला प्रेशर येईना ;आणि थेट वीज पुरवठाही मिळेना

शाश्वत सिंचनाचे सोय जिल्हा 4100 शेतकऱ्यांकडे सौर कृषी पंप

अहमदनगर: शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व पारंपारिक पद्धतीने कृषी पंप जोडणी साठी लागणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना सौर कृषी पंपांचे वितरण करण्यात आले आहे. भरपूर सूर्यप्रकाशामुळे आठ महिने सिंचनासाठी चांगले प्रेशर मिळत असले, तरी सध्याच्या ढगाळ वातावरणात सूर्यप्रकाशा अभावी, सौर पंपांना प्रेशर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात मागील दोन वर्षात 4000 100 शेतकऱ्यांकडे सौरभंप आहेत. पारंपरिक पद्धतीची वीज जोडणी उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुंब योजनेअंतर्गत पारेषण विरहित सौर पंप उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यात फळबाग लागवड खरीप, रब्बी पिके पिके मोठ्या प्रमाणावर घेण्यात येतात. फळबागांसह अन्य पिकांना पाणीपुरवठा आवश्यक असून त्यासाठी सौर कृषी पंप फायदेशीर ठरले आहेत. सौर पंपामुळे दिवसा सिंचन करता येत असले, तरी विजेवर चालणाऱ्या पंपाच्या तुलनेत यातून कमी दाबाने पाणी फेकले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.