सावेडी तलाठी कार्यालयावर कामाचा बोजा

महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांना भाजप कडून निवेदन

(वैष्णवी घोडके)

सावेडी, अहमदनगर येथील तलाठी कार्यालयावर बरेच दिवसांपासून कामाचा प्रचंड ताण आल्याचं दिसून येतंय. सामान्य नागरिकांना त्यांची कामं करून घेण्यासाठी १५ ते २० चकरा माराव्या लागत आहेत. साधा उतारा काढण्यासाठी नागरिकांना ६ महिने वाट बघावी लागतीये. उताऱ्यावर नाव लावून घेणं सुद्धा अवघड होऊन बसलं आहे. या संदर्भात पं. दीनदयाळ पतसंस्थेचे वसंत लोढा यांनी सावेडी तलाठी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन, त्यांच्याशी संवाद साधला.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

हे सावेडी तलाठी कार्यालय महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात ह्यांच्या अखत्यारीत येतं. त्यामुळे, वसंत लोढा ह्यांनी सावेडीतील दोन्ही विभाग लवकरात लवकर सुरु करून हा कामाचा ताण कमी करावा,असे निवेदन महसूल मंत्री ह्यांना देण्याचं आश्वासन दिलं.