कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनची शहरात जनजागृती

भावी डॉक्टरांनी रस्त्यावर उतरुन कोरोना प्रतिबंधात्मकतेसाठी केले मार्गदर्शन

अहमदनगर(वैष्णवी घोडके)

शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या वतीने जनजागृती अभियान राबविण्यात आले. शहरातील सिग्नलवर विखे पाटील मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांनी मास्क न वापरणार्‍या नागरिकांना मास्क देऊन कोरोनाचे संक्रमण थांबविण्याची विनंती केली. महाविद्यालयात शिकत असलेल्या भावी डॉक्टरांनी रस्त्यावर उतरुन कोरोना प्रतिबंधात्मकतेसाठी उपाययोजनांची माहिती देऊन, वापरलेल्या मास्कची विल्हेवाट लावण्याबद्दल मार्गदर्शन केले.

 

 

 

डिएसपी चौक येथील सिग्नलवर कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती अभियानाचे प्रारंभ शहराचे विभागीय पोलीस उपाधिक्षक विशाल ढुमे यांच्या हस्ते झाले. यावेळी शहर वाहतुक शाखेचे पो.नि. राजेंद्र भोसले, भिंगार कॅम्पचे सहा.पो.नि. शशीकुमार देशमुख, विखे पाटील कॉलेजचे डॉ. जहीर मुजावर आदींसह कॉलेजचे विद्यार्थी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा.

 

 

पोलीस उपाधिक्षक विशाल ढुमे म्हणाले की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कोरोनाची तिसरी लाट येत असताना ती थोपावण्यासाठी जागृक राहण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी निष्काळजीपणाने न वागता कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जागृक राहून नियमांचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले. सहा.पो.नि. शशीकुमार देशमुख यांनी नागरिकांना कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मास्कचा वापर व फिजीकट डिस्टन्स ठेवण्याचे सांगितले. डॉ. जहीर मुजावर यांनी कोरोनाची तिसरी लाट महाभयंकर असणार असून, नागरिकांची वेळीच जागृक होण्याची गरज आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी विखे पाटील मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलच्या माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचे सांगितले. या उपक्रमासाठी विखे पाटील मेडिकल फाऊंडेशनचे संचालक खासदार डॉ. सुजय विखे पाटील, उपसंचालक डॉ. अभिजीत दिवटे, कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलचे डीन सुनिल म्हस्के, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.