सर्वाधिक वडाचे झाडे असलेले कोल्हार गाव

वृक्षारोपण व संवर्धन चळवळीत सातत्याने कार्यरत असलेल्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी वडाची 500 झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. कोल्हार हे आता सर्वाधिक वडाचे झाडे असलेले गाव म्हणून पुढे आले आहे. मागील चार वर्षात लावण्यात आलेली मोठ्या प्रमाणात झाडे जगवण्यात आली असून, ती झाडे चांगली बहरलेली आहेत. कोल्हार येथे जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून वडाच्या झाडांची लागवड करण्यात आली होती. कोल्हुबाई माता गड येथील महादेव मंदिर परिसरात 500 वडांच्या झाडांची भगवान शंकराची पिंड साकारण्यात आली आहे. कोल्हार घाट कोलोबाई माता गोड येथे 120 झाडाची झाडे लावण्यात आली. कोलुबाई माता प्रवेशद्वार ते गावातील रस्त्यावर फुल झाडे लावण्यात आली आहे. देवीच्या गड परिसरात परिसरात 1000 रानटी फळझाडे गावातील दिवंगत व्यक्तींच्या नावाने लावण्यात आली आहे. कोल्हार येथे एकूण 620 झाडे फुलवण्यात आली आहे. गावातील वनराईमुळे निसर्ग बहरला असून ऑक्सिजनचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच नटलेल्या हिरवाईने कोल्हुबाई माता गोड व महादेव मंदिर परिसर पर्यटन केंद्र म्हणून पुढे येणार आहे. त्यामुळे गावाच्या उत्पन्नात देखील वाढ होईल व गावातील जनसामान्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. वडाच्या झाडाची लागवड व संवर्धनासाठी अनेकांनी मेहेनत घेतली आहे.