प्रतिकात्मक भजन दिंडी करून विश्व हिंदू परिषदेचे वारकरी निवेदन

दिंडीत ४० वारकर्यांना परवानगी द्यावी

नगर-वारकरींसोबत बैठकीला मुख्यमंत्र्यानी प्रतिसाद दिला नाही.दिंडीत ४० वारकर्यांना परवानगी द्यावी.अशी मागणी केली होती.ती मागणी शासनाने अमान्य केली.परत १० वारकर्यांना परवानगी अशी मागणी केली तरी ती अमान्य केली आहे.वारकरी कोरोनाचे सर्व नियम पाळून लसीकरण करून प्रवास करतील.

 

 

 

वारकर्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने सरकारला जाग यावी यासाठी प्रतिकात्मक भजन दिंडी करून ”ज्ञानोबा माऊली तुकाराम” असा विठुरायाच्या गजर करत भक्तिमय वातावरणात वारकरी पोशाखात विश्व हिंदू परिषदेचे वारकरी संदर्भात निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रांत अधिकारी सुधाकर भोसले व आमदार संग्राम जगताप यांना देण्यात आले.या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी,कार्याध्यक्ष अँड जय भोसले,जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,मिलिंद मोभारकर ,जिल्हा कोषाध्यक्ष मुकुल गन्धे,मठ मंदिर समितीचे प्रमुख,हरिभाऊ डोळसे,निलेश चिपाडे,शहर मंत्री श्रीकांत नांदापूरकर,विशाल रायमोकर,उमाकांत जांभळे,दीपक वांढेकर,राजेंद्र चुंबळकर,संत सावता माळी युवक संघाचे अध्यक्ष सचिन गुलदगड आदी उपस्थित होते.

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

 

 

देशात सर्वत्र जनजीवन सामान्य होत असताना.हॉटेल्स,मॉल,दारूची दुकाने,बाजारपेठा लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रास सुरु आहेत.आषाढी एकादशी पासून महाराष्ट्रात विविध भागात विविध मठांमध्ये चालणारे वारकरी  चातुर्मास सेवा व मंदिरातील पारंपारिक उत्सव,वारकरी सप्ताह, कीर्तने, प्रवचने,दर्शन या वरील प्रतिबंध दूर करावे.जसे कार्यालयात,बस प्रवासात,थिएटर किंवा हॉटेल मध्ये ५० % उपस्थितीला मान्यता दिली आहे तशी ह्या अनुष्ठानांना अनुमती द्यावी.अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी केली आहे.