प्रा.आबासाहेब नाथा यादव यांना भारतीय संविधान जनजागृती रक्षक २०२३ चा पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र राज्य पर्यटन कला संस्कृती मुंबई व महाराष्ट्र राज्य जागतिक मानवाधिकार संरक्षण आयोगाच्या वतीने देण्यात येणारा ‘भारतीय संविधान जनजागृती रक्षक २०२३’ पुरस्कार श्रीगोंदा येथिल ‘प्रा.आबासाहेब नाथा यादव’ यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल देण्यात येत आहे.

यावेळी समाज कल्याण विभाग सौ.संगीता डावखर, पिंपरी चिंचवडचे मंडल अधिकारी शेखर शिंदे, भोसरी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर मधुकर पाटील, पुणे लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बाबुराव भिडे, पिंपरी चिंचवडचे तलाठी दिपाली दयाराम बच्छाव, पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर उषाताई वाडेकर, परशुराम वाडेकर, राज्य निवडणूक प्रमुख बाबासाहेब ढसाळ, बबन जोगदंड, यशदा बाणेर, एस.एम. देशमुख, महात्मा गांधी कन्या विद्यालय च्या मुख्याध्यापिका कांबळे मॅडम, नूतन शिंदे, प्रशांत बनसोडे, कांतीलाल जाडकर आदिसह मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला.