अवैधरित्या अफीम तस्करी प्रकरणी एकास जामीन मंजुर
राज्यस्थान पुण्यात अफीम विक्री करण्यासाठी आणल्याचा होता संशय
पुणे- (Metro News Team) पुणे मधील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने राजस्थान मधून पुण्यात अफीम विक्री करिता आणल्याचा संशयावरून आरोपी जितेंद्र शर्मा ( रा. आंबेगाव पठार , मूळ गाव शेरगड, जोधपुर राजस्थान ) याला पेट्रोलिंग करत असताना सुमारे 9 लाख रुपये किंमतीचे अफीम हे अंमली पदार्थ मिळून आले. सदरील आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचे आदेश केले. आरोपी हा येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे न्यायालयीन कोठडीमध्ये होता.
यावेळी आरोपीने ॲड .आदेश सोमनाथ चव्हाण यांच्यामार्फत मा. जिल्हा सत्र न्यायाधीश शिरसाळकर साहेब यांच्या कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. सदरील जामीन अर्जात मा. न्यायालयाने सरकारी वकील , पोलीस व आरोपीचे वकील यांचा युक्तिवाद ऐकुन घेतला व आरोपीचे वकील ॲड .आदेश चव्हाण यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीस सशर्त व ५०,०००/- रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला. आरोपीचे वकील आदेश चव्हाण यांना ॲड. हर्षवर्धन तांबे , यांनी विशेष सहाय्य केले.