कचरा ठेक्याचे आयते कुरण चरण्यासाठीच पालिकेने टेंडर काढले का ?

शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांचा सवाल

अहमदनगर (प्रतिनिधी) : महानगर पालिकेने खाजगी कचरा गोळा करण्यासाठी यावर्षी पुन्हा टेंडर प्रसिद्धीला दिले आहे. हे टेंडर म्हणजे पालिका अधिकारी आणि ठेकेदारांना चरण्यासाठी आयते कुरण झाले आहे का त्यासाठीच हे टेंडर काढण्यात आले आहे का ? असा सवाल शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी विचारला आहे. याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिद्धीला दिले असून पालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा नमुना असलेले हे टेंडर तात्काळ रद्द करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे.

यात त्यांनी म्हंटले आहे . शहराच्या आरोग्य रस्ते वीज आणि पाणी या मूलभूत गरजा पूर्ण पूर्ण करण्याची जबाबदारी पालिकेची असते. पालिकेने विद्युत विभागाचे खाजगीरकरण केले. रस्ते देखील खाजगी ठेकेदाराकडून बांधून घेतले जातात. मध्यंतरी पाणीपुरवठा विभागाचा ठेका देण्याचा घाट घालण्यात आला होता. आणि कचरा उचलण्याचा ठेका तर अगोदरच दिलेला आहे. तो देखील वादात आहे. संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कचरा उचलण्याची बोगस बिले काढण्याच्या प्रकार उघडकीस आल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे . तरीदेखील नव्याने हा ठेका देण्याचा विचार पालिका कसा करू शकते.

वास्तविक कचरा उचलण्यासाठी वाहने अहमदनगर महानगर पालिकेच्या व्यक्तिगत मालकीची आहेत.  नोकरीत कायम असेलल्या शेकडो सफाई कर्मचाऱ्यांना पालिका पगार देते . मग कचरा उचलणाऱ्या घंटा गाड्यावर केवळ ड्राइव्हर  ठेऊन त्यांच्याकडून कचरा गोळा करून तो बुरूडगाव येथील कचरा डेपोत टाकण्यासाठीच फक्त याचे खाजगीकरण करण्यात आले आहे का कारण हे काम पालिका कर्मचारी सक्षमपणे करू शकते. पालिका कर्मचाऱ्यांना जेवढा महिन्याला एकूण पगार दिला जातो तितकेच पैसे पालिका या कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला देते म्हणजे पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कचरा उचलण्याचा कामाचे चरण्यासाठी आयते  कुरण करण्यासाठीच हा ठेका आहे का? अगोदरच ठेकेदार  स्वयंभू ट्रान्सपोर्ट हा वादाच्या भोवऱ्यात आहे. तोफखाना पोलिस या कचरा घोटाळ्याची चौकशी करीत आहे. याबाबत  मेहेरबान जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

तरी देखील त्याचे दरमहा कचरा उचलण्याचे बिल रीतसर निघत आहे. आता देखील कचऱ्या नावाखाली डबर तसेच दगड विटा मातीचे वजन करून ते बिलात जोडले  जात आहे. नगर कल्याण रॉड तसे पुणे रोडवर रस्त्याच्या कडेला कचरा साठवून त्याचे दररोज वजन करण्यासाठी त्या कचऱ्याने घनता गाड्या भरून त्याच त्याच कचऱ्याचे दररोज वजन केले जाते. हे प्रकार पुराव्यानिशी उघड केले आहेत तरीदेखील पालिकेच्या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने हे सगळे संबंधित ठेकेदार उजळ माथ्याने करीत आहे.वास्तविक वाहन पालिकेच्या मालकीची आहेत. ठेकेदार संस्था पुण्याची आहे. आणि घंटा गाड्यावर काम करणारे चालक नगरमधीलच आहे. मग हे काम पालिका देखील करू शकते त्यासाठी ठेकेदार नेमण्याची काय गरज त्यामुळे   पालिकेने हे गैरप्रकार थांबवावे आणि जनतेच्या पैशाची अशी सुरु                                                                                        असलेली वारेमाप उधळपट्टी बंद करावी अशी मागणी जाधव यांनी केली आहे.